Nikhil Deepkamal Ghadge - Satara, Maharashtra

 

माझ्यातला "मी" सापडला......

मी निखील दिपकमल घाडगे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यामधील खातगुण हे माझ मुळ गाव. वडील आर्मीमध्ये होते व आई गृहीणी. मोठी बहीण नंदिता, भाऊ विक्रम आणि मी असे आमचे कुटुंब. वडील दारु प्यायचे त्यामुळे घरची संपुर्ण जबाबदारी आईवर होती. पैशांसाठी आत्या व काका सतत त्रास देत असत. वडीलांच्या सततच्या दारुने व आजारपणामुळे बहीणीचे लग्न १७ व्या वर्षी लावले. काही दिवसांतच आईने आत्महत्या केली व वडीलही आजारपणाने गेले.

मी माध्यमीक शिक्षणासाठी मावशीकडे राहीलो. उत्तम शिक्षकांमुळे व परिस्थीतीच्या जाणीवेमुळे दहावीत मला ८०.९२% मार्क्स मिळाले व मी शाळेत पहीला आलो. हा आनंद मोठा होता आणि घातकही.... दहावीच्या मार्क्समुळे मी अतिआत्मविश्वासीत झालो. कोणाचेही काहीही न ऐकता व माझ्यातील क्षमतेचा विचार न करता अकरावी सायन्सला अॅडमीशन घेतले. आपण खुप हुशार आहोत या गैरसमजात मी अभ्यासाकडे दुर्लक्ष केले. लेक्चर बुडवणे, टाईमपास करणे, फिरणे व चुकीच्या मित्रांच्या संगतीमुळे माझी शैक्षणीक प्रगती खालावली. याचा थेट परिणाम म्हणजे अकरावीत मला अवघे ६६% मार्क्स मिळाले.

त्यातुनही मी काहीच बोध घेतला नाही. बारावीच्या महत्वाच्या वर्षात मी पुन्हा तीच चुक केली. आणि बारावीत फक्त ५४% मार्क्स मिळाले. आता मात्र परिस्थीती बिकट झाली. कोठेच अॅडमीशन मिळेनासे झाले. भविष्याबाबत चिंता वाटु लागली. कुटुंबीय तणावात होते. माझ्या सर्व चुका मला आठवु लागल्या. आपण आयुष्यातील खुप मोठी चुक केली आहे असे सतत जाणवु लागले.....

बारावीतील कमी मार्क्समुळे नाईलाजास्तव बारामतीतील एका इंजीनीअरींग काॅलेजमध्ये मेकॅनिकल डिप्लोमाच्या प्रथम वर्षाला अॅडमीशन घेतले. ( बारावीत जर चांगले गुण असते तर थेट दुसर्‍या वर्षाला अॅडमीशन मिळते व एक वर्ष व वर्षाचा खर्च वाचतो.) १ आॅगस्ट २०१२ ला काॅलेज सुरु झाले. त्यावेळी नोटीस बोर्डला MRA Let's Make A Difference ची युथ काॅन्फरेन्स बारामती येथे होणार आहे असे पोस्टर वाचले. माझ्या काॅलेजमधुन सहभागी होणार्‍या मुलांची संपुर्ण फी काॅलेज भरणार असल्यामुळे व चार दिवसांची संपुर्ण हजेरी लावली जाणार होती त्यामुळे मी काॅन्फरन्सला जाण्याचा निर्णय घेतला. ११ ते १४ आॅगस्ट असे चार दिवस ती काॅन्फरन्स होणार होती. त्यासाठी आमच्या काॅलेजमधुन २५ विद्यार्थी सहभागी झाले होते.

पहील्या दिवशी उद्घाटन व ओळख झाले. नवीन मित्र, मैत्रीणी मिळाले. आठ ग्रुप पाडले गेले. माझ्या ग्रुपमध्ये चाळीस लोक होते. दुसर्‍या दिवशी सकाळी विरल सरांनी डायरी व पेन दिले. "क्वाईट टाईम" ही संकल्पना समजावली व आम्हाला "क्वाईट टाईमसाठी" वेळ दिला. जेव्हा डायरीवर लिहायला सुरुवात केली तेव्हा माझा भुतकाळ डोळ्यांसमोर उभा राहीला. सगळ्या चुका समोर दिसु लागल्या. सगळ डायरीमध्ये उतरवु लागलो. आणि रोजच्यापेक्षा काहीतरी वेगळेपणा जाणवु लागला. गोल्फबाॅल एक्सरसाईज, जार एक्सरसाईज, आय एक्सरसाईज, लेटर टु सेल्फ, फॅमिली सेशन सगळ समजवुन घेतल. ग्रुप डिस्कशनमधील विषय व त्यातील चर्चा खुप छान व्हायच्या. माझे अनुभव व विचार मांडता आले. चार दिवसांत मला माझ्या सगळ्या चुकांची जाणीव झाली होती व त्या चुका आता कशा सुधरतील यावर विचार करण्यासाठी "क्वाईट टाईम" करण्याचा संकल्प केला.

काॅन्फरन्स नंतर मला माझ्यातला बदल जाणवु लागला. विरल सरांबरोबर संपर्क वाढला. माझ्या अडचणींवर ते मार्गदर्शन करु लागले. सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. "इनर वाॅईस" जागा झाला. अभ्यासात प्रगती झाली. वर्तनुक सुधारली. आणि याचा थेट परिणाम म्हणजे माझा जेव्हा पहील्या वर्षाचा निकाल लागला तेव्हा मलासुद्धा सुखद धक्का बसला कारण मला गुण होते ८४.४% आणि मी वर्गात पहीला आलो होतो......

हेच सातत्य ठेवण्यासाठी मी १-८ जुन २०१३ ला पाचगणी येथे नॅशनल युथ काॅन्फरन्समध्ये सहभागी झालो. देश-विदेशातील मित्रमैत्रीणी व MRA सेंटरशी आजन्म नातं तयार झाल. २०१३ पासुन बारामतीत को-आॅरडीनेटर म्हणुन काम पाहतोय. अभ्यासातली गती पुन्हा मिळाली. फॅमिली रिलेशन्स चांगले झाले. शेवटच्या वर्षी ७०% गुण मिळाले. आज "क्लाउज युनियन" या मल्टीनॅशनल कंपणीत प्रोडक्शन इंजीनीअर म्हणुन कामाला आहे.

आयुष्याला कलाटणी देणारी ती चार दिवसांची काॅन्फरन्स केली याचा आज आनंद होतोय. विरल सरांच्या सानिध्यात आल्यामुळे आज व्यवस्थीत व चांगले जीवण जगत आहे. MRA या दुसर्‍या कुटुंबाचा मी सदस्य आहे याचा अभिमान वाटतोय. Let's Make A Difference ची विचारधारा कायम आचरणात ठेवण्याचा प्रयत्न करेन. या प्रवाहात आल्यामुळेच मला माझ्यातला "मी" सापडला.........!!!!!!!!

I found the 'ME' in myself

Myself Nikhil Deepkamal Ghadge hailing from Khatgun Hamlet, Satara district at post Khatav, my father was an Army man and Mother a Home maker, siblings Nandita and Vikram such is our family. My father was a hardcore drunkard so the responsibility of my family rested on my mother's shoulders. My paternal Uncle and Aunty would harass us for money. Due to my father's drinking problem and ill health we had to get my sister married at the age of 17 years. A few days later my mother committed suicide and my father also passed away.

I stayed at my maternal Aunt's place for my studies. Owing to all the encouragement and support from my teachers' also being aware of the circumstances at home I worked hard to score 80.92% in tenth standard. This happiness was not only overwhelming but also damaging, disrespecting every ones opinion and not understanding my own caliber and potential I took admission for science. Being overconfident and overestimating my intelligence and true potential I overlooked studies started bunking lectures, doing time pass in college, bad company, loitering around which reflected on my studies and fared with 66% in my eleventh standard. I was such blindfolded that I didn't learn my lessons from all this and repeated my mistake in standard twelve scoring 54% . This poor show in academics made it extremely challenging for me to get admissions. My family too was tensed about me. 

Owing to low score in standard twelve I had to unwillingly take admission in Baramati Engineering college for Mechanical  Diploma (If one scores well in std Twelve then he gets admission for second year diploma directly hence saving one year fees expense)

My college started on August 1, 2012 that’s when I read on the notice board about MRA- Let's Make A Difference youth conference. The fees were to be paid by the college and all those attending this conference were to be marked present was informed by the college authorities hence I decided to attend this conference. The conference was held from 12-14 August 2012. First day was ceremonial, Inauguration and introduction with new people. We were 40 of us in a group, Next day Viral Sir gave us Diaries and pens. He explained to us the concept of Quiet time and gave us time to remain Quiet. While writing on my diary I reflected on my past, I could see all my mistakes and jotted the same in my diary. That day I could feel something unusual about myself. Golf Ball exercise, Jar exercise, I exercise, family session, letter to self were conducted during the conference. The group discussions were very interactive wherein I could speak my mind, my experiences and thoughts. Those four days were a boon for me! I realized my mistakes and decided to make Quiet time an integral part of my routine.

After the conference I could see the change in myself. I started being in touch with Viral Sir and seeking guidance from him which created positive energy in me and I could connect with my inner voice resulting in better academics, I stood first in my Class scoring 84.4% in my first year. This urged me to go to Panchgani for NYC where I came across people from all walks of Life and made friends not only in India but also overseas. Today I have an everlasting relation with the centre. Since then I contribute as a coordinator from Baramati. This conference made me a better person, my relations at home have improved. I fared with 70% in my last year. Today I am the production engineer for a MNC named 'Klouj Union'

I am glad that I attended this conference which brought a 360 degrees change in me. I am proud to be a  part of the MRA family. I will try to live by the standards of IofC Let's Make A Difference as this is the one which helped in finding the 'ME' in myself.

Stories of Change

Subscribe Our Newsletter