Akshata Ghogare - Sholapur, Maharashtra

 

साल 2007 मध्ये माझे शालेय जीवन पूर्ण करून मी पुढील शिक्षणासाठी बारामती येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालयात प्रवेश घेतला.

घरापासून लांब राहण्याची माझी पहिलीच वेळ होती. हॉस्टेलवरील सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते. सतत आई-वडिलांची आठवण येत असे. त्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित होत नव्हते.

माझ्या महाविद्यालयात विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी विविध कार्यशाळा घेण्यात येत असत. मन रमण्यासाठी मी प्रत्येक कार्यशाळा खूप मन लावून ऐकत असायचे.

हॉस्टेलच्या सुरुवातीच्या काही महिन्यांतच एक व्याख्यान मला ऐकायला मिळाले आणि त्या व्याख्यानाचा खोलवर परिणाम माझ्या मनावर झाला. ते व्याख्याते होते विरल मजुमदार सर. त्यांनी त्यांच्या बोलण्यातून माझ्या मनात चाललेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिली.

त्यांच्या व्याख्यानाच्या शेवटी बारामती येथे होणाऱ्या LMAD च्या regional conference बद्दल सांगितले. ती conference 3 दिवस चालणार होती. मी एक क्षणही विचार न करता माझे registration करून टाकले. Conference मध्ये काय होणार हे माहित नव्हते, तरीही मी सहभागी झाले. आणि 2007 मध्ये झालेली ती regional conference माझे पूर्ण जीवन बदलून गेली.

"आयुष्य हे पूर्णपणे नैतिक मूल्यांवर जगायचे" ही गोष्ट विरल सर तीन दिवस वेगवेगळे उदाहरणे देऊन समजावत होते. Conference संपल्यानंतर खरे आयुष्य जगण्यास माझी सुरुवात झाली. आई-वडिलांसोबत माझे नाते मजबूत झाले. नात्यात व माझ्या वागण्यात बदल माझे आई-वडिलही पाहत होते. Conference मध्ये Quiet time पण शिकवण्यात आला होता. मी नित्य नियमाने Quiet time करू लागले. मनात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मीच शोधायला लागले. LMAD च्या विचारधारेवर मी खूप कमी वयात चालायला सुरुवात केल्यामुळे माझ्या हातून कोणती चूक झाली नाही याचा मला आणि माझ्या आई-वडिलांना नेहमीच अभिमान वाटतो.

2007 च्या conference नंतर मला पुन्हा एकदा 2011 मध्ये regional conference मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. त्या conference नंतर मला एक गोष्ट जाणवत होती – ती म्हणजे, आपल्या सारख्या असंख्य मित्रांना ही चांगली गोष्ट माहित झाली पाहिजे. तेव्हापासून मी प्रत्येक वर्षी माझ्या भावाला ही conference attend करण्यासाठी प्रोत्साहन देत होते. परंतु वेगवेगळ्या कारणांमुळे तो सहभागी होऊ शकला नाही.

LMAD ची National conference attend करण्याची माझी पण खूप इच्छा होती, परंतु काही कारणांमुळे मीही सहभागी होऊ शकले नाही.

अखेर 2022 मध्ये माझा भाऊ प्रथमेश हा National conference मध्ये सहभागी झाला. आठ दिवसांची ती conference त्याच्या आयुष्यालाही बदलवणार होती, ही मात्र खात्री होती – आणि तसेच झाले. त्यानंतर त्याने LMAD ची Fellowship ही पूर्ण केली.Fellowship दरम्यान ,विरल सरांनी माझ्या कुटुंबीयांना दिल्लीला आमंत्रित केले होते. त्यावेळी मी, माझी आई व माझे दोन मुलं, अर्णव (8 वर्ष) शिवांश (5 वर्ष) आम्ही दिल्लीला गेलो होतो. विरल सर आणि नेहा मॅम यांनी खुप प्रेमाने आमचे स्वागत आणि आदरातिथ्य केले.नेहा मॅम आणि विरल सर यांची काम करण्याची पद्धत खुप जवळुन पाहिली. त्या 4 दिवसात खुप काही शिकायला मिळाले.माझी मुले  टिव्ही- मोबाईल शिवाय जेवण करत नव्हती. दिल्लीहून आल्या पासून त्याची मोबाईल पाहण्याची सवय बंद झाली. टिव्ही आणि मोबाईल पासून मुलांना लांब ठेवणे हे आजकालच्या पालकांसाठी खुप आव्हानात्मक काम आहे.आणि ते टास्क सरांनी

खुप सहज पार केले.4 दिवसात मी माझ्या मुलांमधे खुप सकारात्मक बदल आनुभवत होते. एक पालक म्हणून ही  माझ्या साठी खुप मोठी गोष्ट आहेत. दिल्ली मध्ये सरांच्या घरी भेट देऊन मला काम आणि घर या दोन्ही गोष्टी मधील सुसूत्रीकरण जमायला लागले. त्या नियोजनाच थेट परिणाम माझ्या कामाच्या उत्पादकतेवर झाला.

पुढे सहा महिन्यांत प्रथमेश 11 conference मध्ये  स्वयंसेवक म्हणून सहभागी झाला.

मी स्वतः एवढे काम करू शकले नाही, जेवढे त्याने सहा महिन्यांत करून दाखवले. 2023 मध्ये जमशेदपूर येथे होणाऱ्या regional conference मध्ये स्वयंसेवक म्हणून जाण्याचा आग्रह मला माझ्या भावाने – प्रथमेशने – केला. आणि मी तब्बल 11 वर्षांनी पुन्हा एकदा conference मध्ये सहभागी झाले. माझ्या लग्नानंतर आणि माझ्या मुलांच्या जन्मानंतर मला मिळालेली ही सुवर्णसंधी होती. मला माझा गमावलेला आत्मविश्वास या conference नंतर पुन्हा मिळाला. "माझेही एक स्वतंत्र आयुष्य आहे," हे मी मुलांच्या संगोपनात पूर्ण विसरून गेले होते. मी माझे coaching classes सुरू केले. LMAD ची विचारधारा सोबत ठेवून मी माझ्या व्यवसायात पुढे जात आहे.

माझ्यात असलेल्या आत्मविश्वासाचे मी पूर्ण श्रेय विरल सरांना देईन. त्याच आत्मविश्वासाच्या आधारावर माझ्या classes चे नाव मोठे करण्यात मला हळूहळू यश मिळत आहे. 2024 मध्ये मला पहिल्यांदाच LMAD च्या National Youth Conference मध्ये सहभागी होण्याचे भाग्य लाभले. त्या conference च्या सुरुवातीला एक workshop घेण्यात आली होती – सर्व स्वयंसेवकांसाठी घेतलेली एक कार्यशाळा, ज्यामध्ये पूर्ण 8 दिवसांचे वेळेचे नियोजन अगदी काटेकोरपणे केले जाते. एवढी शिस्त आणि व्यवस्थितपणा मी प्रथमच पाहिला. मोबाईलच्या युगात पूर्ण आठ दिवस मोबाइल शिवाय जगायला शिकले.

प्रथमेश नी फेलोशिप दरम्यान केलेल्याच कामाचे कौतुक म्हणून सरांनी माझ्या पालकांना कॉन्फरन्स मध्ये बोलवले होते. कॉन्फरन्स मधिल वातावरण माझ्या पालकांसाठी नवीन होते. तेथील प्रत्येक गोष्ट पाहून ते भारावून गेले.प्रथमेश च्या कामांचे  प्रेझेंटेशन पाहून दोघांच्याही डोळ्यात आम्ही आश्रृ पाहिले. केवळ 6 महिन्यांत प्रथमेश मध्ये झालेला बदल त्यांच्या कल्पने पलीकडचा होता. कॉन्फरन्स मधे होणारे सेशन्स माझे पालक खूप मन लावून ऐकत होते.‌ त्या नंतर त्यांचा आम्हा दोघांकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही खुप बदलला आहे. आज पर्यंत नेहा मॅम आणि विरल सर यांच्या बद्दल त्यांनी फक्त ऐकले होते पण त्यांना भेटण्या योग काॅन्फरंस मुळे आला. आपल्या मुलांवर आपल्या पेक्षा जास्त प्रेम कुणी करू शकत या वर त्यांच्या विश्वास बसत नव्हता.

आठ दिवसांच्या conference चा मला फायदा तर झालाच, त्याहीपेक्षा अधिक फायदा मला volunteer workshop चा झाला. तिथे शिकून आलेली प्रत्येक गोष्ट मी माझे आयुष्य सुधारण्यासाठी वापरत आहे.

माझ्या आयुष्याबरोबरच माझ्या मुलांचेही आयुष्य उत्तम घडवण्याचे मार्ग मला LMAD मुळेच मिळत आहेत. विरल सरां सोबत काम केल्यामुळे प्रथमेश मध्येही काम करण्याच्या कौशल्य मध्येही सकारात्मक बदल झाले आहेत. ते पाहून माझ्या वडिलांच्या चेहर्‍यावर एक समाधान पाहायला मिळते.

ज्या मार्गावर मी आणि माझा भाऊ चालत आहोत, असा मार्ग इतर मुलांनाही दाखवण्यासाठी आम्ही काम करण्यास सज्ज आहोत. येणाऱ्या पुढील वर्षांमध्ये शक्य तेवढे काम करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

After completing my schooling in 2007 I took admission in Sharadabai Pawar College at Baramati. This was the first time I was staying away from my home in Dharashiv (formerly Osmanabad). The initial days in the Hostel were tough. I used to remember my parents every now and then. It was difficult to concentrate on my study. My college used to conduct several workshops on different subjects to guide students. I used to attend each of them with full attention partly to keep my mind engaged.

During the early months in the hostel, I was able to attend one lecture which deeply impacted my mind. It was by Viral Mujumdar Sir. It answered all questions hovering in my mind. At the end of his speech, he mentioned about a 3-day regional conference of LMAD to be held at Baramati. Without even a moment of thinking I registered my name for it. I knew nothing about what was to happen at that conference but still I participated in it. That Conference of 2007 completely changed my life.

Over next three days Viral Sir explained to us how one’s life can be lived entirely based on moral values. He gave several examples. After the Conference I started truly living my life. It strengthened the relationship between me and my parents. After I reached my home, my parents were also observing the change in my behaviour and change in our relationship. During the Conference we were taught how to observe the Quiet Time and I started having such Quiet Time regularly. I started searching replies for many questions which used to come up in my mind. Me and my parents are always proud that since I started living according to the principles of LMAD I could avoid many mistakes.

After that Conference in 2007 I had another opportunity to participate in a regional Conference in 2011. During that subsequent Conference I realized that several of my friends should also know about this good way of Living. Every year I used to encourage my brother Prathmesh to attend the LMAD Conference but for variety of reasons he could not participate. I too wanted to attend a National Conference of LMAD but for some reasons that could not happen. Eventually in 2022 my brother could attend a National Conference. I was sure that that conference of eight days was bound to change his life and that did happen. After that he also completed a fellowship of LMAD in Delhi.

During this Fellowship Viral Sir had invited our family to Delhi. That time me, my mother and my two children visited Delhi. Viral Sir and Neha Madam welcomed us with great affection and looked after us very well. During those four days I could observe closely the way Viral Sir and Neha Madam worked and I could learn a lot from that. My children never used to eat without TV and mobile. But after our return from Delhi their habit of mobile watching has stopped. It is a challenging task for today’s parents to keep their children away from TV and mobile but Viral Sir helped us to accomplish that rather easily. I could experience many positive changes in my children during those four days. It is quite significant achievement for me as a parent. During my visit to Viral Sir’s home, I also learnt how to balance work and home. It directly improved productivity in my work.

During the subsequent six months Prathmesh could volunteer in eleven conferences. I had not managed to do the work that he could do in those six months.

Prathmesh insisted that I attend a regional conference in Jamshedpur in 2023 and after almost 11 years I could once again participate in an LMAD conference. This was a golden opportunity for me after my marriage and birth of two children. That conference enabled me to regain the confidence which I had lost by then. In the process of raising my children I had totally forgotten that I too have an independent life. I started my Coaching Classes. I am today advancing in my professional work keeping the company of LMAD philosophy. I shall give to Viral Sir full credit for my confidence. Because of that confidence I am gradually succeeding in acquiring the good name for my Classes.

In 2024 I had the good fortune of attending a National Youth Conference of LMAD for the first time. Before the actual Conference there was a preparatory workshop for all volunteers during which all the events of the 8-Day Conference were meticulously planned. This was the first time I saw so much discipline and neatness. In these days of mobiles, I learnt to live for full eight days without a mobile!

In appreciation of the work done by Prathmesh during the Fellowship, Viral Sir had invited my parents for this National Conference. The atmosphere at the Conference was a novelty for my parents. They were overwhelmed by everything they saw. I saw the tears in their eyes when they attended the presentation by Prathmesh about his work. The change in Prathmesh during just six months after the Fellowship was beyond their imagination. My parents attended the Conference sessions with full attention. Their attitude towards both of us has changed a lot after that Conference. Till then my parents had just heard about Viral Sir and Neha Mam but the Conference gave my parents the opportunity to meet them for the first time. They could hardly believe that somebody can love their children even more than what they as parents did.

The 8-Day conference did benefit me but I was benefitted even more by the volunteer workshop. Everything I learnt then I am now using to improve my life. LMAD has also shown me the way in which, apart from improving my own life, I can improve the life of my children. Prathmesh has also improved his own way of working because of working closely with Viral Sir. As a result of seeing that improvement I can see the sense of satisfaction on my father’s face.

We are now prepared to show other youngsters the path on which we have started walking. During the coming years we are to going to try our best to work as much as possible in fulfilling that purpose.

- Akshata

Stories of Change

Subscribe Our Newsletter